आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक,:हिंगोली, चाळीसगाव,औरंगाबाद जिल्ह्यासह कर्नाटकातील घरफोडी केल्याची कबुली

हिंगोली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीसह इतर जिल्ह्यात चोरी व घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांनी हिंगोली,परभणी, चाळीसगाव, आष्टी, औरंगाबाद या भागासह कर्नाटकातील बिदर येथे चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी (ता. 5) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दिवसा तसेच रात्रीच्या वेळी घरेफोडून चोऱ्या केल्या जात होत्या. या चोऱ्यांचा तपास लावण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

त्यावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोेलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, राजेश मलपिल्लू, जमादार भगवान आडे, किशोर कातकडे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळे, नितीन गोरे, ज्ञानेश्‍वर साळवे, तुषार ठाकरे, शेख जावेद, शेख शकील यांचे पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने काढलेल्या माहितीनुंतर पोलिसांनी परभणी येथील शेख खय्यूम शेख रफीक, शेख रहिम उर्फ शेरा शेख चाँद (रा. कुर्बाणीशाहनगर परभणी) यांना अटक केली.

पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी हिंगोली, सेनगाव, वसमत शहर येथे चोरी व घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला 1.11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी परभणी, चाळीसगाव, आष्टी, बिदर (कर्नाटक), औरंगाबाद येथेही चोरी व घरफोड्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून आणखी घरफोड्या उघडकिस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...