आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र नाराजी:मराठवाड्यातील 176 शाळा खोली बांधकामांना मुहूर्त लागलाच नाही

हिंगोली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेल्या शाळा खोली बांधकामापैकी ५६३ कामे अपूर्ण असून त्यापैकी १७६ कामांना मुहूर्त लागला नाही. या प्रकारामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे १७००० शाळा आहेत. या शाळेमधून बहुतांश ठिकाणी वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी वर्ग खोल्यांमधील फरशा उखडल्या असून काही ठिकाणी खिडक्याच गायब झाल्या. काही ठिकाणी भिंतींना तडे गेले तर काही शाळांमधून वर्गखोलीवरील छताचे पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वर्गात बसून भिजण्याचा आनंद घ्यावा लागत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, मराठवाड्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत वर्गखोल्यांची दुरुस्ती व नवीन वर्गखोल्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली. मात्र सध्याच्या स्थितीत मराठवाड्यात ५६३ कामे अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ३८७ कामे प्रगतिपथावर असून १७६ कामे शिक्षण विभागाला सुरूच करता आली नाहीत.

विभागीय आयुक्त कार्यालयाची तीव्र नाराजी
मराठवाड्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत अपूर्ण कामांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तसेच १७६ कामे सुरू नसल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...