आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेणारा जाळ्यात:दहा हजारांची लाच घेणारा कंत्राटी अभियंता जाळ्यात, घरकुलाचा तिसरा हप्ता जमा करण्यासाठी मागितले पैसे

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील अकोली येथे घरकुलाचा तिसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणारा कंत्राटी अभियंता शेख समीर शेख खैसर यास नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वसमत तालुक्यातील अकोली येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. त्यानुसार लाभार्थीने घरकुलाचे कामही सुरू केले. या घरकुलाचा तिसरा हप्ता लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी वसमत पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता शेख समीर शेख खैसरने दहा हजार लाच मागितली. तसेच अन्य कंत्राटी अभियंता करीम कुरेशी शादुल्ला याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचा शाेध सुरू आहे. या प्रकरणात संबंधित लाभार्थीने नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक राहुल पखाले, जमादार एकनाथ गंगातीर्थ, गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड, किसन चिंतोरे, मारोती मूलगीर, शेख मुजीब, व गजानन राऊत यांच्या पथकाने अकोली येथे आज सापळा रचला होता. लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभियंत्याला रंगेहाथ पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...