आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाला मोठा दिलासा:हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व 45 कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभागाचे कार्यालय निर्जंतुक करण्यात आले आहे. त्यानंतर विभागातील ४५ जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल आज बुधवारी प्राप्त झाले असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.

पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला उपचारासाठी शासकिय रुग्णालयाच्या कोविड विभागात भरती करण्यात आले आहे. त्यास कुठलेही गंभीर लक्षणे नसल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले. इतर सर्व कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असला तरी कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या नागरिकांनी मास्क घालूनच जिल्हा परिषदमध्ये प्रवेश करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

काळजीचे कारण नाही

जिल्ह्यात आरोग्याच्या बाबतीत सर्व परिस्थितीचा सामना करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी जातांना मास्क वापरावा तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी देखील प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मास्क वापरावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...