आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाने सोडला सुटकेचा निश्वास:हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व 45 कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभाग निर्जंतुक करण्यात आला आहे. त्यानंतर विभागातील 45 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले. या सर्वांचे अहवाल बुधवारी ता. 8 प्राप्त झाले असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाती कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यास उपचारासाठी शासकिय रुग्णालयाच्या कोविड विभागात भरती करण्यात आले असून त्यास कुठलेही गंभीर लक्षणे नसल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, त्यानंतर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सोमवारी ता. 6 सायंकाळी निर्जंतूक करण्यात आला आहे.या शिवाय आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या 45 कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याचा अहवाल आज सकाळी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या सर्व 45 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र त्यानंतरही जिल्हा परिषद येथील कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या नागरिकांनी मास्क लाऊनच जिल्हा परिषद मध्ये प्रवेश करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात आरोग्याच्या बाबतीत सर्व परिस्थितीचा सामना करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी जातांना मास्क वापरावा तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी देखील प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मास्क वापरावा. सर्व परिस्थितीचा सामना करण्यास यंत्रणा सज्ज असल्याचे हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...