आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:कळमनुरीत चुलत भाऊ - बहिणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

हिंगोली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे चुलत भाऊ बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोन्ही मृतदेहावर डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी ता. 14 सकाळी उत्तरीय तपासणी केली जात आहे. ऐश्वर्या पंडित (18) व आनंदा पंडित (28) अशी मृत झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे ऐश्वर्या पंडित व त्यांचा चुलत भाऊ आनंदा पंडित हे एकाच गल्लीमध्ये राहतात. सोमवारी (ता.13) सायंकाळी सहा वाजता घरी कोणी नसल्याचे पाहून ऐश्वर्या हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आखाडाबाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग, राजेश मुलगीर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.

दरम्यान आज पहाटे आनंदा पंडित यांनी डोंगरकडा शिवारामध्ये एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी डोंगरकडा शहरात जाऊन आनंदा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथे आणला आहे. मृत आनंदा पंडित व ऐश्वर्या पंडित हे दोघेजण चुलत भाऊ बहीण आहेत. दरम्यान या दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर या प्रकरणी कुठल्या प्रकारची नोंद आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...