आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछपरा एक्सप्रेस रेल्वे हिंगोली मार्गे सुरू करावी तसेच इतर रेल्वेगाड्या या रेल्वे मार्गावरून सुरू करण्याच्या मागणीसाठी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (7 नोव्हेंबरला) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास आणखी तिव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येथील महात्मा गांधी चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीचे माजी आ.गजानन घुगे, नंदकिशार तोष्णीवाल, विनायक भिसे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक अनिल नेनवाणी, गोवर्धन विरकुंवर, बंसतकुमार भट्ट, शेख नईम शेख लाल, शेख खलील बेलदार, अजित मगर, पंकज अग्रवाल, अॅड.अनिल तोष्णीवाल, रविंद्र वाढे, सुरेश सराफ, प्रा.पंढरीनाथ घुगे, माबुद बागवान, सुमेध मुळे, प्रमोद मुंदडा, मिलींद उबाळे, डॉ.विजय निलावार, बिरजु यादव, जेठानंद नेनवाणी, कृष्णा अग्रवाल, सुभाष लदनिया, विश्वास नायक, नरबदप्रसाद अग्रवाल, कैलास शहाणे, गुड्डू भट्ट, अश्विन भट्ट, प्रद्युम्न गिरीकर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
यावेळी माजी नगराध्यक्ष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. रेल्वे प्रशासनाने हिंगोलीकरांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. रेल्वे संघर्ष समितीच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. या मागण्यांबाबत विचार न केल्यास ता. 23 नोव्हेंबर रोजी जिल्हा बंद केला जाईल. त्यानंतर तिव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
अशी आहे मागणी
यावेळी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. छपरा एक्सप्रेस पूर्णा-अकोला या रेल्वे मार्गाने सुरू करावी, अकोला-पूर्णा या रेल्वे मार्गावरून मुंबईला जाणारी रेल्वे सुरू करा, तसेच हिंगोली जिल्ह्यातील व्यापार पेठेकरीता अत्यावश्यक असलेले गुड्सशेड तात्काळ उभारण्यात यावे, या मार्गावरील बंद असलेल्या सर्व गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.