आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिनामाच्या गजरामध्ये निघाली पालखी:संत नामदेव महाराजांच्या पालखीचे नरसी नामदेव येथून प्रस्थान; शेकडो भाविकांची उपस्थिती

हिंगोली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पालखीचे शनिवारी दुपारी चार वाजता नरसी नामदेव येथून प्रस्थान झाले. हरिनामाच्या गजरात निघालेल्या या पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांची उपस्थिती होती.

भाविकांची गर्दी

संत नामदेव महाराजांची जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव यातून दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होते. या पालखी सोहळ्यामध्ये तीन ठिकाणी रिंगण केले जाते. दुपारी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा झाल्यानंतर पालखी सोहळा काढण्यात आला. यावेळी बळीराम सोळंके, भारत महाराज बेंगाळ, राजेश नागरे, सुभाषराव हुले, डॉक्टर रमेश शिंदे, श्री मोरे, शशिकांत गवते यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.

इथे असेल मुक्काम

पालखीची नरसी गावात नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर नरसी येथे पालखीचा मुक्काम होणार आहे. रविवारी सकाळी पालखी हिंगोलीकडे प्रस्थान करणार आहे. हिंगोली येथे दुपारी चार वाजता रामलीला मैदान येथे पालखीचे पहिले रिंगण होणार आहे. त्यानंतर ता 28 जून रोजी अंबाजोगाई येथे दुसरे रिंगण, तर 30 जून रोजी जऊळबन येथे तिसरे रिंगण होणार आहे. तारीख 10 जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

बातम्या आणखी आहेत...