आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा:विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन अन् नवसाचे माेदक घेण्यास अडीच लाखांवर भाविक आज हिंगाेलीत

हिंगाेली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी तसेच नवसाचा मोदक घेण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी (९ सप्टेंबर) सुमारे अडीच लाख भाविक येण्याची शक्यता आहे. काेराेनामध्ये दाेन वर्षे दर्शन बंद हाेते. मागील दाेन वर्षे वगळता दरवर्षी एक ते सव्वा लाखापर्यंत भाविक येतात. यंदा आणखी लाखाची भर पडणार असल्याचा दावा मंदिर संस्थानचे सचिव दिलीप बांगर यांनी केला.

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानसोबतच पोलिस प्रशासन व पालिका प्रशासन सज्ज झाले आहेत. या वेळी नवसाच्या मोदकांचे वाटपही केले जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह राज्याबाहेरून भाविक येणार आहेत. त्यासाठी सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. पोलिस विभागाने बॅरिकेड्स तयार केले आहेत.

आरोग्य पथक तैनात हिंगाेलीत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, दिल्ली येथून अडीच लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विविध व्यायामशाळा, संस्था, मित्रमंडळ व संघटना अशा सुमारे ४० जणांकडून ठिकठिकाणी चहा, भाेजन, नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आराेग्य विभागाच्या ६ रुग्णवाहिका व आराेग्य पथकही तैनात असणार आहे.

नांदेड, परभणी, वाशिम, कळमनुरी, औंढा, सेनगाव या भागातून येणाऱ्या भाविकांची वाहने उभे करण्यासाठी रामलीला मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे .

दर्शना मार्गावर सीसीटीव्ही इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशासाठी मनाई असणार आहे. दर्शन रांगेमध्ये छायाचित्रीकरण केले जाणार असून सीसीटीव्हीदेखील बसवण्यात आले आहेत. मंदिर परिसरात नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.

जवळा पळशी मार्गाने येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. 10 पाेलिस निरीक्षक व इतर अधिकारी असणार तैनात. 300 पाेलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान असतील. 100 पालिकेचे कर्मचारी स्वच्छतेसाठी असणार.

बातम्या आणखी आहेत...