आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुल मंजूर असतानाही केवळ जागा उपलब्ध नसल्याने २ हजार लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. या लाभार्थींना आता जागा मिळण्याची प्रतीक्षा आहे.
मराठवाड्यात प्रधानमंत्री आवास योजना युद्धपातळीवर राबवली जात आहे. या योजनेमध्ये लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी १ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या शिवाय स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छतागृह बांधकामासाठी १२ हजारांचा निधी देखील दिला जात आहे. दरम्यान, ज्या लाभार्थींना घरकुल मंजूर झाले आहे. मात्र त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसेल तर अशा लाभार्थींना पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेतून ५० हजार रुपये जागा खरेदीसाठी दिले जात आहेत. यामध्ये लाभार्थींनी जागा खरेदी करून घरकुलाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे.
मराठवाड्यात घरकुलाचे बांधकाम मंजूर झाले असतानाही केवळ जागा नसल्यामुळे ४,४७३ लाभार्थींचा जागा खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाने या लाभार्थींना पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेतून ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे २४५९ लाभार्थींच्या घरकुल बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र अद्यापही २०१४ लाभार्थींना जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांचे घरकुलाचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
५० हजार रुपयांची मदत तुटपुंजी : घरकुल बांधकामासाठी जागा खरेदीसाठी शासनाकडून ५० हजार रुपयांची मदत केली जात आहे. यात पाचशे चौरस फूट जागा कशी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२४५९ लाभार्थींना मिळाली जागा
जिल्हा लाभार्थी
हिंगोली ७२१
लातूर ३९
औरंगाबाद १०७३
नांदेड २७३
बीड ६७
जालना १०४
उस्मानाबाद १६०
परभणी २२
जिल्हा लाभार्थी हिंगोली २६० लातूर ७३२ औरंगाबाद ३२२ नांदेड १२ बीड ४२ जालना ४०२ उस्मानाबाद १७६ परभणी ६८
लाभार्थींसाठी गृहसंकुलाचा प्रयत्न
लाभार्थींना ग्रामीण भागात वैयक्तिकरीत्या जागा घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता गृहसंकुल बांधकाम करून जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कांडली येथे आठ लाभार्थींना एकत्रितरीत्या जागा उपलब्ध करून देत संकुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यात इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहेत.
- डॉ. विशाल राठोड, प्रकल्प अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.