आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जड वाहनांना सोमवारी शहरात प्रवेश बंदी:हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल

हिंगोली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी ता. 8 होणाऱ्या कावड यात्रेमुळे वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून दुपारी एक ते रात्री आठ यावेळेत शहरात जड वाहने आणण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने सोमवारी ता. 8 कावड यात्रा आयोजित केली आहे. या कावड यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी शहरासह परिसरात आवश्‍यक बंदोबस्त तैनात करण्यासाठी पाहणी देखील केली आहे. त्यानंतर वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार सोमावारी दुपारी एक ते रात्री आठ वाजे पर्यंत नर्सी टी पाॅईंट, खटकाळी बायपास, अकोला बायपास येथून शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच शहरातील अग्नीशमन दल कार्यालय ते इंदिरा गांधी चौक या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

दरम्यान, औंढा नागनाथ, सेनगावकडून हिंगोली शहरात येणाऱ्या व वाशीमच्या दिशेने जाण्यासाठी कयाधू नदी, नांदेडनाका, जिल्हा परिषद कॉर्नर, बियाणीनगर कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, रिसालाबाजार, अकोला बायपास मार्गे जाता येणार आहे. तर वाशीमकडून औढा, नर्सीकडे जाणाऱ्या वाहनांना याच मार्गाने जावे लागेल. तसेच जवळा पळशीकडून येणाऱ्या वाहनांना सिध्दार्थ नगर, आरामशीन, रेल्वेस्टेशन रोड, एलआयसी ऑफीस, पोस्ट ऑफीस, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक या मार्गे यावे लागेल.

भाविकांसाठी या ठिकाणी असणार वाहनाची पार्किंग

या कावड यात्रेसाठी औंढा, नर्सीकडून येणाऱ्या भाविकांसाठी एनटीसी मैदानावर दुचाकी, चारचाकी वाहन पार्कीग व्यवस्था केली आहे. कळमनुरी मार्गे येणाऱ्या भाविकांना जिल्हा परिषद मैदान, जवळा पळशी मार्गे येणाऱ्या भाविकांना बाजार समिती मैदान, हिंगोली शहरातील भाविकांसाठी रामलिला मैदान येथे दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...