आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजेगाव ते गोरेगाव मार्गावर गोटवाडी शिवारात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा पिकअप उलटून झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवार, ६ रोजी सकाळी साडेदहा वाजता हा अपघात झाला.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील वऱ्हाडी मंडळी पिकअपने लग्नासाठी गोरेगाव येथे जात होती. या वेळी आजेगाव ते गोरेगाव मार्गावर गोटवाडी शिवारात अचानक एक दुचाकी वाहन पिकअपच्या समोर आले. त्यामुळे चालकाने ब्रेक दाबल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् पिकअप रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. या अपघातात पिकअपमधील शेख इम्रान, शेख करीम, शेख समीर, शेख अमन, सोहिल कुरेशी, नीलेश दळवी, शेख बशीर, शेख इर्शाद हे जखमी झाले. या अपघातातील जखमींना परिसरातील नागरिकांनी पिकअपमधून बाहेर काढून उपचारासाठी तातडीने हिंगोलीला हलवले. हिंगोली येथील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये डॉ. अखिल अग्रवाल, डॉ. संदीप इंगळे, डॉ. मंगेश मुंडे, डॉ. मयूर अग्रवाल यांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले असून जखमींपैकी चौघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.