आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्हयात ६१ ग्रामपंचायतीसाठी रविवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी ३३ टक्के मतदान झाले होते. आडगाव येथील मतदान केंद्रावर आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मतदान केले. तर सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे सासू-सुनेमध्ये कोण बाजी मारणार? याकडे जिल्हा्याचे लक्ष लागले आहे.
हिंगोली जिल्हयात ६१ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये सरपंच पदासोबतच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी मतदान घेतले जात आहे. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील १६, हिंगोली तालुक्यातील १६, सेनगाव तालुक्यात १०, औंढा नागनाथ तालुक्यातील ७ तर वसमत तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
चोख पोलिस बंदोबस्त
दरम्यान, निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मतदान केंद्रावर पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर संवेदनशील मतदान केंद्रावर वाढीव पोलिस बंदोबस्त आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी त्यांच्या उपविभागात भेटी देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली आहे.
दरम्यान, सकाळ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. मतदारांच्या मदतीसाठी उमेदवारांचे समर्थक मतदान केंद्राच्या बाहेर शामीयाना टाकून बसले होते. मतदान केंद्राच्या शंभर मिटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी ३३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिंगोली तालु्यातील आडगाव मुटकुळे येथे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. तर सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे सासू शोभाबाई धामणकर तर त्यांच्या विरुध्द सून संगिता धामणकर या निवडणुक रिंगणात आहे. सासू विरुध्द सून असाच सामना रंगला असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे जिल्हयाचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.