आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 18 ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेंच्या 26 शाखा स्थापन करा:केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना साकडे

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात राष्ट्रीयकृत बँकेचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी जिल्हयातील 18 ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या 26 शाखा स्थापन कराव्यात या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची औरंगाबाद येथे भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे प्रदेश पदाधिकारी रामदास पाटील यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन डॉ. कराड यांनी यावेळी दिले.

हिंगोली लोकसभा मतदार संघाचा संपूर्ण अभ्यासदौरा केल्यानंतर भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे प्रदेश पदाधिकारी यांनी शेतकरी व जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामीण भागातून राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा नसल्याने पिककर्ज मिळणे व इतर बँकेच्या व्यवहारासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारीही शेतकरी व गावकऱ्यांनी केल्या होत्या. कुठल्याही परिस्थितीत बँक शाखा सुरु करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन पाटील यांनी लोकसभा मतदार संघातील शेतकरी व जनतेला दिले.

त्यानुसार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकाशिष्टमंडळाने औरंगाबाद येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली. यावेळी शिरडशहापूर येथील मिलींद यंबल, यशवंत रावले, पंडीत जोगदंड, बालाजी कोरडे, कैलास बोंगाणे, शिवशंकर स्वामी, डॉ. नंदकुमार चिकलेवार, संतोष चटप, गणेश रावले, शिवशंकर देशपांडे यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कराड यांना शिरडशहापूर व इतर मोठ्या गावांसाठी राष्ट्रीयकृत बँकेची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. जिल्हयातील 18 गावांमधून 26 शाखा पाहिजे असल्याचे स्पष्ट केले. त्यावर डॉ. कराड यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच शिरडशहापूर व इतर भागात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शेतकऱ्यांना पिककर्जासाठी फायदा

जिल्हयात राष्ट्रीयकृत बँकेची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना पिककर्ज मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेची स्थापना झाल्यास गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

-रामदास पाटील, भाजपा दिव्यांग आघाडी प्रदेश पदाधिकारी

बातम्या आणखी आहेत...