आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तीची स्थापना:भगवान बाहुबलीच्या 51 फुटी मूर्तीची स्थापना, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मूर्ती पुसेगावात

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील पुसेगाव येथे भगवान बाहुबली यांच्या ५१ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना रविवारी (९ मे) करण्यात आली. कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथील बाहुबली मूर्तीनंतर पुसेगाव येथील दुसरी सर्वात उंच भगवान बाहुबलीची मूर्ती आहे. समितीचे अध्यक्ष राजेंद्र जैन, कार्याध्यक्ष रवी कान्हेड यांच्यासह कैलास भुरे, डॉ. भालचंद्र कान्हेड, संजय वाळले, सुदर्शन कान्हेड, दशरथ मांगुलकर, कीर्तिचंद भुरे, दता साळवे यांच्यासह समाजाच्या वतीने मूर्ती स्थापनेसाठी पुढाकार घेण्यात आला. राजस्थान येथील बिजोलिया ग्रेनाइटपासून एकाच दगडात भगवान बाहुबलीची मूर्ती कोरण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...