आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोट:हळद शिजवण्याच्या कुकरचा स्फोट; चार जण गंभीर जखमी; कहाकर बुद्रुक येथील घटना

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक येथे हळद शिजवण्याच्या कुकरचा वाफेच्या दाबामुळे स्फोट झाल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१९) रात्री घडली. चौघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कहाकर बुद्रुक येथे देवराव पोपळघट यांच्या शेतात हळद शिजवण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संदीप पोपळघट यांनी त्यांच्या मालकीचे कुकर शेतात आणले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास देवराव पोपळघट, संदीप पोपळघट, अजय अमृता खंदारे व कांबळे असे चौघेजण तेथे काम करत होते. त्यांनी कुकरमध्ये हळद व पाणी टाकले. कुकर खाली जाळ पेटवला. दरम्यान, यावेळी कुकरवर असलेली शिटी लॉक झाल्यामुळे वाफ बाहेर पडण्यास जागाच राहिली नाही.

त्यामुळे अद्याप कुकर तापले नाही असे गृहीत धरून चौघेही कुकरपासून काही अंतरावर जाऊन जेवणासाठी बसले. मात्र यावेळी कुकरमध्ये वाफेचा दाब येऊन कुकरचा स्फोट झाला. यात कुकरच्या तीनही टाक्या उडून बाजूला पडल्या. तर कुकरमधील गरम पाणी व हळद या चौघांच्या अंगावर पडली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, शेतामधून मोठा आवाज झाल्याने परिसरातील शेतकरी धावत घटनास्थळी गेले त्याठिकाणी चौघेजण गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत दिसून आले. कांबळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवले तर दोघे जण अकोला तर एकास वाशीमला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...