आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरे थांबवावेत:अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतची गरज - विरोधी पक्षनेते अजित पवार

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाले असतांना मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मात्र दिल्ली दौरे करत आहेत. त्यांनी दिल्ली व इतर दौरे थांबवून शेतकऱ्यांना मदत जाहीर करून अडचणीतून बाहेर काढले पाहिजे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी (30 जुलै) दुपारी डोंगरकडा (ता.कळमनुरी) येथे केले.

पिकांच्या नुकसानीची केली पाहणी

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी माजीमंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजेश नवघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जेष्ठ नेते दत्तराव अडकिणे, आनंदराव कदम, डी. एन. अडकिणे, ठाकूरसिंग बावरी, डॉ. संतोष बोंढारे, शिवाजी शिंदे पुयनेकर, शेख शोएब, योगेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

काय म्हणाले पवार?

यावेळी पवार म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यातच व्यस्त आहे. राज्यात शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट ओढवले असून, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष न देता त्यांचे दिल्ली दौरेच सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. सरकारने प्रत्येक जिल्हयासाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करून नुकसानीची माहिती घ्यावी. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन मोठा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोठे आहेत हे कळायला मार्ग नाही. सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...