आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा:गोरेगाव-जिंतूर मार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांकडून शासनाचा निषेध

हिंगोली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोरेगाव अपर तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन शनिवारी चौथ्या दिवशी कायम आहे. संतप्त शेतकऱ्यांनी गोरेगाव-जिंतूर मार्गावर टायर जाळून शासनाचा निषेध केला.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा तसेच मागील वर्षीची १३ कोटी ८९ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना शुक्रवारी काळे झेंडे दाखवले, तर भगवती येथे काहींनी जलसमाधी आंदोलन केले.

रविवारी हिंगोली, सेनगाव, गोरेगाव बंदचे आवाहन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. पीक विम्याच्या प्रश्नावर रविवारी सेनगाव, गोरेगाव व हिंगोली बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...