आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली जिल्ह्यात भीषण अपघात:2 ठार 6 जखमी, बाराशीव कारखान्याजवळ भरधाव टेम्पोची टाटा मॅजिकला धडक

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळा बाजार ते औंढा नागनाथ मार्गावर बाराशिव कारखान्याजवळ भरधाव टेम्पो ने टाटा मॅजिक ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 15) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोपान अण्णासाहेब कुरे (45), किसन गंगाधर वाहुळे (20, रा. दिग्रस कुरे जिल्हा परभणी) अशी मयताची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील डिग्रस कुरे येथील 10 जण उसाचे वाढे घेऊन टाटा मॅजिक ऑटोने (एमएच- 13- एएन- 6584) औंढा नागनाथ कडे येत होते. त्यांचे वाहन जवळा बाजार ते औंढा नागनाथ मार्गावर बाराशिव कारखान्याजवळ आले असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टेंम्पोने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातामुळे टाटा मॅजिक ऑटो रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. या अपघातामध्ये ऑटो मधील उसाच्या वाढयावर बसलेले सोपान कुरे व किसन वाहूळे जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती मिळतात हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार भुजंग कोकरे, राजू ठाकूर, राजेश वळसे, अंबादास बेले, महेश गर्जे, सचिन सांगळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या विष्णू विठ्ठल कुरे, ज्ञानोबा हरिभाऊ कुरे, सोपान नीलकंठ कुरे, मोतीराम बाळासाहेब कुरे, गोपाल नरहरी कुरे, लक्ष्मण संभाजी कदम यांना उपचारासाठी तातडीने औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे

तर मृत झालेल्या दोघांवर उत्तरीय तपासणी करण्यासाठी जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...