आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोषागारातून वेतन द्यावे:राज्यातील नगरपालिका-नगरपंचायतचे पन्नास हजार कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात, मंगळवारी काळ्या फिती लावून काम करणार

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील नगरपालिका नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागार कार्यालयातून वेतन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीचे सुमारे ५० हजार पेक्षा अधिक कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यामध्ये आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी ता. ५ काळ्या फिती लावून निदर्शने केली जाणार आहेत.

राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत संवर्ग कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागार कार्यालयामार्फत अदा करण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तातडीने अदा करावी, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना त्वरित सेवेत सामावून घ्यावे, सफाई कामगारांना घरे बांधून द्यावीत, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक व वर्ग चारच्या तसेच इतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नत्या देऊन वेतन श्रेणी लागू करावी, भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्येचा विचार करून सुधारित आकृतिबंध आराखडा तयार करण्यात यावा, नगरपालिका कर्मचारी व संवर्ग कर्मचाऱ्यामथून मुख्यधिकारी पद दहा टक्के ऐवजी ५o टक्के पदोन्नतीने भरावीत, यासह विविध २५ मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ता. ५ एप्रिल रोजी नगरपालिका व नगर पंचायती समोर काळया फिती लाऊन निदर्शने केली जाणार आहेत. त्यानंतर ता. 20 एप्रिल रोजी मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र दिनी ता. १ मे पासून ध्वजवंदना नंतर सर्व अत्यावश्यक सेवेसह बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनामध्ये राज्यातील पन्नास हजार पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती हिंगोली जिल्हा अध्यक्ष रघुनाथ बांगर, रत्नाकर आडशिरे, संदीप घुगे, विनय साहू यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...