आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:कपड्यांच्या दुकानास आग; 60 लाख रुपयांचे नुकसान

हिंगोली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील महेश चौक भागातील नॅशनल फॅशन रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला मंगळवारी (ता. ७) मध्यरात्री लागलेल्या आगीत सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पालिका प्रशासन, पोलिसांच्या सतर्कतेने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे या आगीची झळ इतर दुकानांना पोहोचली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हिंगोली शहरातील महेश चौक भागात मोहंमद वसीमखान यांचे नॅशनल फॅशन रेडिमेड कपड्याचे दुकान आहे. या ठिकाणी सध्या सेल असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कपडे विक्रीसाठी आणण्यात आले होते. नेहमीप्रमाणे मोहंमद वसीमखान हे मंगळवारी (ता. ७) रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. मात्र मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलास पाचारण केले. पालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी व पोलिस तसेच नागरिकांनी आगीवर पाणी ओतून आग विझविली. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व कपड्यांचे नुकसान झाले. काही कपडे जळून खाक झाले तर काही कपडे पाण्यात भिजल्यामुळे खराब झाले. या आगीमध्ये सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिस, पालिका प्रशासनाचे कर्मचारी व नागरिकांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे बाजूला असलेल्या कपड्यांच्या दुकानाला आगीची झळ पोहोचली नाही. शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...