आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Five Persons Arrested For Robbing Mahant's Earring In Hingoli With Pistol, Performance Of Local Crime Branch, 3.25 Lakh Worth Of Valuables Seized Including One Pistol

महंताच्या कानशिलावर पिस्टल लाऊन लुटण्याचे प्रकरण:5 जणांना अटक; एका पिस्टलसह 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरालगत खडेश्‍वर बाबा मठात महंताच्या कानशिलावर पिस्टल लाऊन लुटणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ता. 4 अटक केली असून त्यांच्याकडून एक पिस्टल, सोन्याचे दागिने, मोबाईल असा 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हिंगोली शहरालगत खडेश्‍वर बाबा मठातील महंत सुमेरपुरी महाराज यांच्या कानशिलावर पिस्टल लाऊन सोन्याच्या अंगठ्या व इतर साहित्य पळविण्यात आले होते. ता. 25 जानेवारी रोजी सदर घटना घडली होती. या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन केले होते.

पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, सुनील गोपीनवार, जमादार संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, भगवान आडे, ज्ञानेश्‍वर पोकळे यांच्या पथकाने मागील चार दिवसांपासून माहिती घेण्यात सुरवात केली होती. यामध्ये पोलिसांनी ओमसाई खरात, प्रदीप गायकवाड , अंकुश गायकवाड (रा. हिंगोली), कैलास देवकर (रा. गोरेगाव), राहुल घनवट (रा. साखरखेर्डा) यांना ताब्यात घेतले. यावेळी चौकशीमध्ये अंकूश गायकवाड याने दरोडा टाकण्यासाठी ओमसाई खरात याच्याकडून पिस्टल घेतल्याचे स्पष्ट झाले. तर यातील मुद्देमाल वाटून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक पिस्टल व तीन जिवंत काडतुसचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...