आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाला शिवीगाळ:पाच जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली वसमत तालुक्यातील वाई फाटा येथे पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ करुन धमकी देणाऱ्या पाच जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात रविवारी 19 जून रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील वाईफाटा येथे सुरेश प्रल्हाद कदम, प्रल्हाद मारोती कदम, विनय विलास मोगले, दत्ता संभाजी कदम व अन्य एक जण आपसात हाणामारी करत होते. यावेळी कुरुंदा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज गवळी तेथे पोहोचले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी उपनिरीक्षक गवळी यांनाच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर अडचणीत आणून पाहून घेण्याची धमकी दिली. या शिवाय गवळी यांच्या सोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली. त्यानंतर पाचही जण निघून गेले.

गुन्हा दाखल

या प्रकरणी गवळी यांनी आज पहाटे कुरुंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सुरेश कदम, प्रल्हाद कदम, विनय भोगले, दत्ता कदम व अन्य एका विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...