आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशिम:मानोरा तालुक्यातील शेंदुरजना आढाव परिसरात जंगलाला आग, लाखोंची वनसंपदा नष्ट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्याने जाळलेल्या काडीकचऱ्याची ठिणगी उडून प्रादेशिक वनिवभागाच्या जंगलास आग लागल्याची घटना शनिवारी मानोरा तालुक्यातील ढोणी ते शेंदुरजना आढाव परिसरात घडली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो आपत्ती व्यवस्थापन पथकातील सदस्यांनी तत्परता दाखवत तासाभरातच ही आग नियंत्रणात आणली. तथापि, या आगीत लाखोंची वनसंपदा जळून खाक झाली.

मानोरा तालुक्यातील शेंदुरजना, ढोणी परिसरात शेतकऱ्याने पेटवलेल्या काडीकचऱ्याची ठिणगी हवेने उडून नजिकच्या जंगलात पडली. आगीच्या ठिगणीमुळे जंगलात पसरलेल्या पालापाचोळ्याने क्षणाधार्त पेट घेतला. दरम्यान, याच वेळी दत्तक ग्राम ढोणी येथे साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जिल्हास्तरीय विशेष श्रम संस्कार शिबिर ढोणीत सुरू होते. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमादरम्यानच जंगलास आग लागल्याची माहिती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळाली. त्यावरून पथकातील सदस्यांनी तातडीने धाव घेत ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळाने मानोरा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी येथे फायर ब्लोअर पाठविले. त्यानंतर वनकर्मचारी व रासेयो पथकाने ही आग तासाभरात विझविली.

मुलींनी केले शर्थीचे प्रयत्न
वनोजाच्या साळुंकाबाई राऊत महाविद्यालयातील रासेयो आपत्ती व्यवस्थापन पथकातील मुले आग विझविण्यासाठी झाडांच्या हिरव्या पानांचा आधार घेऊन धडपड करीत असताना या पथकातील मुलींनीही धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून मोलाचे सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...