आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत येताच हल्लाबोल:नगरसेवकाची लायकी नसतानाही आमदार केले; वानखेडेंची पाटील, कल्याणकर यांच्यावर टीका

नांदेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका टुकाराला खासदार केले त्यानंतरही तो गद्दार निघाला, हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये कुठल्याही गावात या गद्दारांना फिरू देणार नसून, त्यासाठी आम्ही गावबंदी केल्याशिवाय राहणार नाही, अशी जहरी टीका हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर केली आहे. ते आज नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाच्या मोठ्या बंडानंतर शिवसेनेला गळती लागली असताना, माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी मुंबईत बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. 2009 ते 2014 या काळात ते शिवसेनेचे हिंगोली खासदार होते. त्याआधी त्यांनी हदगाव विधानसभा मतदानसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते भाजप, काँग्रेस असा प्रवास करुन त्यांनी पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली आहे. घरवापसी केल्यानंतर त्यांनी आता बंडखोरांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

टुकार संसदेत पोहोचला

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावर बोलताना वानखेडे म्हणाले की, रस्त्यावरचा टुकार आज देशाच्या संसदेत पोहोचला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच हेमंत पाटील निवडून आले, हे त्यांनी विसरू नये.

नगरसेवकाचीही लायकी नव्हती

नांदेड जिल्ह्यातील आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील शिवसेनेतून बंडखोरी केली असून, त्यांच्यावर टीका करताना वानखेडे म्हणाले की, बालाजी कल्याणकर यांची लायकी नगरसेवक होण्याची देखील नव्हती. पण त्यांना शिवसेनेने आमदार केले, त्यांना जायचेच होते तर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यायला पाहिजे होते, भाजपच्या ईडी आणि 50 कोटींसाठी हे लोकं शिवसेनेतून गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

याआधी का नाही सांगितले

पुढे वानखेडे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावर टीका केली, ते म्हणाले की, हेमंत पाटील हे किती दारिद्र्यवान व्यक्ती होते, आज हा व्यक्ती हजारो कोंटीचा मालक झालाच कसा, असा सवाल वानखेडे यांनी विचारला आहे. आज हेमंत पाटील यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर आरोप करत म्हटले आहे की, उमेदवारीसाठी विनायक राऊत पैसै घेतात. त्यावर बोलताना वानखेडे म्हणाले की, या आधी तुम्ही का बोलले नाही, आज पक्षांतर केल्यानंतर तुम्ही हे म्हणता, भाजपने तुम्हाला 50-50 कोटी रुपये हे जनतेला त्यांनी सांगावे.

बंडखोरांना इशारा

या दोन्ही गद्दारांनी त्यांची जागा मिळवून देण्याचे काम नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील यावेळी वानखेडे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...