आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत जुगार अड्डयावर छापा:4.38 लाखांचा ऐवज जप्त, 18 जणांवर गुन्हा दाखल, रविवारी रात्री पोलिसांची कारवाई

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील पोस्ट ऑफीस रोड भागात पोलिसांच्या पथकाने जुगार अड्डयावर छापा टाकून दोन दुचाकी वाहने, 21 मोबाईल सह 4.38 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी 18 जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रविवारी ता. 28 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील पोस्ट ऑफीस रोड भागात एका ठिकाणी काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने रात्री छापा टाकला. यामध्ये 18 जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 1.54 लाख रुपये रोख, दोन दुचाकी व 21 मोबाईल असा 4.38 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

या प्रकरणी उपनिरीक्षक जिव्हारे यांनी रात्री उशीरा हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी राजेंद्र शर्मा, नितीन साहू, अब्दूल रौफ, शेख साजीद, शेख शकील शेख माजीद, उमेश यादव, विशाल चव्हाण, सचिन पवार, शेख इम्रान, शेख अफरोज (सर्व रा. हिंगोली), अशोक दथरथे, दामोदर शेळके (रा. पोटा शेळके, ता. औंढा), निलेश लदनीया (नर्सी), रामदास चव्हाण (लाख), विश्‍वनाथ घुगे (सेलसुरा), रामप्रसाद अंभोरे (जवळाबाजार) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे. जमादार जाधव पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...