आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Raids On Gambling Dens In Tuljapurwadi | Case Registered Against 24 Gamblers Of Parbhani, 10 Two wheelers, 2 Four wheelers Seized Along With Rs 4.11 Lakh Cash

तुळजापूरवाडी शिवारात जुगार अड्डयावर छापा:परभणीच्या 24 जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल, 10 दुचाकी, 2 चारचाकी वाहनांसह 4.11 लाख रुपये रोख जप्त

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली व परभणी जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या तुळजापूरवाडी शिवारात विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात 4.11 लाख रुपये रोख, 10 दुचाकी तर 2 चारचाकी वाहने असा सुमारे 20.34 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 24 जणांवर हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 7 पहाटे गुन्हा दाखल झाला असून बहुतांश जुगारी परभणी जिल्ह्यातील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली व परभणी जिल्हयाच्या सिमेवर असलेल्या तुळजापूरवाडी शिवारातील एका आखाड्यावर परभणीच्या जुगाऱ्यांनी अंदर बाहर चा डाव मांडला होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी कुटुंर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिनेश येवले यांचे पथक स्थापन करून जुगार अड्डा उध्वस्त करण्याचे आदेश दिले.

यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

त्यावरून उपनिरीक्षक येवले यांच्या पथकाने मंगळवारी ता. 6 रात्री तुळजापूरवाडी शिवारातील एका आखाड्यावर छापा टाकला. यामध्ये 24 जण अंदर बाहर नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 4.11 लाख रुपये रोख, 10 दुचाकी, 2 स्वीफ्ट कार असा 20.34 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक येवले यांच्या तक्रारीवरून बिटीसिंग बावरी, लक्ष्मण गडप्पा, संजय टेकोले, सागर मुंठे, संजय थोरात, व्यंकटेश वानखेडे, गंगाधर पातींकोंडा, विनय लहाने, वैभव झोडपे, सिध्दांत एंगडे, संजय घाडगे (सर्व रा. परभणी), गंगाधर दुधारे (रा. फुकटगाव, ता. पुर्णा), गणेश कदम, माणिक कदम (पुर्णा), विरासिंग दुधाणे (झरी), काशीनाथ चव्हाण, गजानन चव्हाण (आडगाव), विशाल भिमरवार, पंकज पांढरे (वसमत), श्रीकांत खाडे (हट्टा), दिगंबर जाधव (कुरझाळ, ता. औंढा), दामोदर सावंत (बळेगाव), गंगाधर मानवतकर (जवळाबाजार) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन सरोदे, उपनिरीक्षक पठाण पुढील तपास करीत आहेत.

डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न

हिंगोली व परभणी सिमेचा गैरफायदा घेऊन शेतातील आखाड्यावर बस्तान मांडणाऱ्या परभणीच्या जुगाऱ्यांकडून हिंगोली पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे जिल्हयांच्या सिमेवरील शिवारांमध्ये हिंगोली पोलिसांनी तपासणी मोहिम हाती घेण्याची तयारी चालवली आहे.

बातम्या आणखी आहेत...