आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गण गण गणात बोते...:गजानन महाराजांच्या पालखीचे मराठवाड्यात पावसाने स्वागत; 700 पेक्षा अधिक वारकऱ्यांचा उत्साह शिगेला

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील साठ वर्षांपेक्षा अधिक काळापासून आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार्‍या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवारी (16 जून) मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगाव येथे आगमन झाले. पावसाची झड आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

भाविकांना आकर्षण

श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी संत गजानन महाराजांचा पालखी सोहळ्याचे आयोजन मागील 60 वर्षांपासून केले जात आहे. सुमारे 750 किलोमीटर अंतर पायी चालून पालखी पंढरपुरात दाखल होते. या पालखी सोहळ्याचे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांना आकर्षण असते.

संत गजानन महाराज्यांच्या पालखीचे मराठवाड्यात आगमन
संत गजानन महाराज्यांच्या पालखीचे मराठवाड्यात आगमन

सातशेपेक्षा अधिक वारकरी

दरम्यान आज सकाळी आठ वाजता गण गण गणात बोते, तसेच हरिनामाच्या गजरात निघालेला पालखी सोहळा मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगाव येथे दाखल झाला. सुमारेल 700 पेक्षा अधिक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाली आहेत. पालखी सोहळा मराठवाड्यात दाखल होताच हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, गटविकास अधिकारी गोरे, नारायण खेडेकर यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते. एवढी भाविकांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे पाऊस सुरू असतानाही भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पालखी सोहळा सेनगाव येथे मुक्कामी थांबणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...