आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाला अटक:गावठी पिस्तूल, 2 राउंड जप्त; वसमतच्या तरुणाला अटक

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील बोल्डावाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या एका व्यक्तीच्या तपासणीमध्ये १ गावठी पिस्तूल व दोन राउंड, एक लोखंडी खंजीर जप्त केले. याप्रकरणी वसमत येथील कैलास रमेश शिंदे (३२) याच्यावर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (२ डिसेंबर) पहाटे गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुुन्हे शाखेेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, शिवसांब घेवारे, जमादार सुनील अंभोरे, भगवान आडे, संभाजी लकुळे, किशोर आडे यांच्यासह पथक गुरुवारी (१ डिसेंबर) सायंकाळपासूनच गस्तीवर होते. या पथकाने कुरुंदा ते बोल्डा मार्गावर बोल्डावाडी शिवारात एका स्विफ्ट डिझायर कारला (एमएच १३ एझेड ७१६१) थांबवले. त्यात कैलास शिंदेकडे पिस्तूल व हत्यार सापडले.

बातम्या आणखी आहेत...