आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालय स्थलांतरित करण्याचा घाट:हिंगोलीचे आयकर कार्यालय परभणीला हलवण्याचा घाट

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाला १०० कोटी रुपयांचा महसूल देणारे हिंगोलीचे आयकर कार्यालय बंद करून परभणीला स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे. असे झाल्यास हिंगोली जिल्ह्यातील १५ हजार करदात्यांची गैरसोय होणार आहे. हिंगोलीतून मिळणारा महसूल लक्षात घेऊन सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने येथे २०१६ पासून भाडेतत्वावर जागा घेऊन स्वतंत्र आयकर कार्यालय स्थापन केले होते.त्यानंतर करदात्यांची संख्याही वाढली. सध्या हिंगोलीत करदात्यांची संख्या १५ हजारपेक्षा अधिक आहे. यामध्ये पाच हजार व्यापारी, १० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या करदात्यांकडून दरवर्षी सुमारे १०० कोटींचा कर मिळतो. मात्र मागील काही दिवसांमध्ये हिंगोली येथील कार्यालय बंद करून परभणी येथे स्थलांतरित करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यासाठी सप्टेंबरमध्ये नोटीस काढण्यात आली. दरम्यान, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे निवेदन देऊन स्थलांतर रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...