आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार:हिंगोलीत दोघांविरोधात गुन्हा, सोशल मीडियाचा वापर करत तरुणीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरालगत बोळसोंड भागात फेसबुकद्वारे झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण करून तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका तरुणासह दोघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमाच्या जाळ्यात ओढळे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळाबाजर येथील एक तरुणी मागील काही वर्षापासून हिंगोली शहरालगत बळसोंड भागात राहण्यासाठी आली होती. यावेळी तरुणीची फेसबुकद्वारे जुनेद शमीउल्लाखाँ पठाण (रा.पेन्शनपुरा, हिंगोली) याच्या सोबत ओळख झाली. जुनेद याने त्या तरूणीसोबत फेसबुकद्वारे चॅटींग करून तिच्या सोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याशी वारंवार संपर्क साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

भावाचीही मारहाण

जुनेद याने तरुणीला लग्नाचे आमिषही दाखविले. लग्नाच्या अमिषाला बळी पडल्याले त्या तरुणीवर जुनेद याने मागील एक वर्षापासून अत्याचार केले. त्यानंतर मागील काही दिवसांपासून तो त्या तरुणीला मारहाणही करू लागला होता. तर जुनेद याचा भाऊ अजमत शमीउल्लाखाँ पठाण याने त्या तरुणीला 'तु माझ्या भावा सोबत राहू नको, तु त्याला सोडून दे' असे म्हणून तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

आरोपींचा शोध सुरू

या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने शनिवारी रात्री थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जुनेद पठाण व त्याचा भाऊ अजमत पठाण याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक मुपडे, जमादारअशोक धामणे, आकाश पंडीतकर, गजानन पोकळे यांच्या पथकाने रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

बातम्या आणखी आहेत...