आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली क्राईम:गोरेगाव पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या चौघांकडून कट्टर सहा एटीएम कार्ड, आधार कार्ड, वाहनांचे आरसी बुक जप्त

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरेगाव पोलिसांनी कनेरगाव नाका येथील एका ज्वेलर्सच्या दुकाना समोर मंगळवारी ता. 5 पहाटे चार वाजण्याच्या सुमारास थांबलेल्या तवेरा गाडीतील चौघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाने कटर, स्क्रू ड्रायव्हर, सहा एटीएम कार्ड, सहा पॅन कार्ड आधार कार्ड सह विविध वाहनांची आरसी बुक ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये तीन जण अमरावती जिल्ह्यातील तर एक जण उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे.

या प्रकारानंतर पोलिसांनी चौघांचीही झडती घेतली. यामध्ये त्यांच्याकडून सहा एटीएम कार्ड, वेगवेगळ्या नावाचे सहा आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन सिम कार्ड ताब्यात घेतले. पोलिसांनी तवेरा गाडी व सर्व साहित्य जप्त केले असून चौघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

यामध्ये अमरावती येथील महबूब नगरातील मोसिनखान लजीरखान, आझाद नगरातील इम्रानखान सलमानखान , मुस्कान नगरमधील मोहम्मद मलिक मोहम्मद झाकीर तर कळंब येथील फारुक शेख यांचा समावेश आहे. यामध्ये दोन जण चालक असून एक मिस्त्री काम करतो तर एक जण मेकॅनिक आहे.

दरम्यान या बाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी तातडीने पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांना दिली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी चौघांच्या अधिक चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाला गोरेगावकडे रवाना केले आहे.

मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
श्रीदेवी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरेगाव पोलीस ठाणे या प्रकरणातील चौघेजण एका ज्वेलरी च्या दुकानात समोर दिसून आले. त्यांच्याकडे कट्टर लोखंडी रॉड व इतर साहित्य असल्यामुळे त्यांच्यावर संशय आला. चौघांचीही चौकशी केली जात असून त्यांना पुढील चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिली जाणार आहे. त्यांच्याकडून मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...