आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Great Start To District Level Revenue Sports Competition In Hingoli; The Team Will Be Selected For The Divisional Competition From The Competition

क्रीडा विषयक:हिंगोलीत जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेला शानदार सुरुवात; स्पर्धेतून विभागीय स्पर्धेसाठी संघाची होणार निवड

हिंगोली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांना 3 मे मंगळवार पासुन सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतून विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड होणार आहे.

येथील पोलीस कवायत मैदानावर आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार नागनाथ वागवड, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, रमेश गंगावणे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पापळकर पोलीस अधीक्षक कलासागर यांनी मार्गदर्शन केले. आयुष्यामध्ये खेळाला मोठे महत्त्व असून खेळामुळे मानसिक विकास व सांघिक भावना निर्माण होते. त्यासाठी प्रत्येकाने खेळामध्ये मध्ये सहभाग नोंदवला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत हिंगोली उपविभाग, वसमत उपविभाग, कळमनुरी उपविभागातील संघांनी सहभाग नोंदविला आहे. हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, धावणे, गोळा फेक, थाळीफेक यासह मैदानी स्पर्धा घेतल्या जाणार आहे. यामध्ये वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत यश मिळवणाऱ्या संघांना पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेतून नांदेड येथे ता. 5 मे पासून सुरू होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी संघाची निवड केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...