आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापेमारी:हिंगोलीत दोन दुकानांवर जीएसटी पथकाचे छापे

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील फरशी व इतर बांधकाम साहित्य विक्रीच्या दोन दुकानांवर नांदेडच्या वस्तू व सेवाकर विभागाच्या पथकाने गुरुवारी (६ आॅक्टाेबर) दुपारी छापे टाकले. या दोन्ही दुकानांतील कागदपत्रांची तसेच व्यवहारांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

हिंगोली शहरासह जिल्हाभरातील ३,००० व्यावसायिकांची नोंदणी आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू विक्रेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून शासनाला दरवर्षी ८ कोटी रुपयांचा करभरणा केला जातो. करभरणा करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये सोयाबीन खरेदी-विक्रीचा तसेच फरशी व इतर बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून अधिक प्रमाणात कर भरला जातो. करभरणा करण्यासोबतच वर्षभरात खरेदी-विक्रीतून झालेली उलाढाल, सध्या दुकानात असलेला साठा यासह इतर माहिती ऑनलाइन पद्धतीने कार्यालयाला सादर केली जाते. दरम्यान, हिंगोली शहरातील दोन दुकानदारांच्या कागदपत्रांमध्ये करचुकवेगिरीच्या संशयावरून त्या ठिकाणी छापे टाकले.

बातम्या आणखी आहेत...