आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:औंढा नागनाथ येथे गोळी भांडाराच्या दुकानातून दीड लाखाचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात एका गोळी भांडाराच्या दुकानातून तब्बल दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात मंगळवारी ता. ८ रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ येथील देशमुख कॉम्प्लेक्स भागांमध्ये असलेल्या गोळी भांडाराच्या दुकानांमध्ये गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यातिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे,जमादार विशाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे, आकाश टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने दुकानावर छापा टाकला. यामध्ये दुकानात राजनिवास, विमल यासह इतर प्रकारचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्याची पोते जप्त केले असून सदरील गुटखा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या तक्रारीवरून विठ्ठल कानबाराव गडदे ( रा. औंढा नागनाथ ) याच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...