आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसमतमध्ये कारसह 1 लाख 35 हजारांचा गुटखा जप्त:थंडीचा गैरफायदा घेत भल्या पहाटे केली जात होती वाहतूक

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत येथे मामा चौक भागात भल्या पहाटे थंडीचा गैरफायदा घेत गुटखा वाहतुक करणाऱ्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले असून आज पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी छापा टाकून एका कार सह 1.35 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्ती विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या हिंगोली जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडू लागली असून रात्री 9 वाजल्या पासूनच रस्ते सुनसान होऊ लागले आहेत. तर सकाळी 9 नंतरच बाजारपेठ सुरु होऊ लागली आहे. तर रस्त्यावर केवळ मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या व्यक्ती शिवाय कोणीही दिसत नाही. या संधीचा गैरफायदा घेत गुटखा विक्रेचे सक्रिय झाले असून पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या वेळेत गुटख्याची वाहतूक केली जात आहेत.

वसमत येथे आज सकाळी साडेचार वाजताच एका कार मधून गुटखा येत अल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, जमादार भगीरथ सवंडकर, प्रशांत मुंडे यांच्या पथकाने मामा चौकात जाऊन कार चालक नवीनदखान पठाण याची चौकशी सुरु केली. मात्र पोलिसांच्या प्रश्‍नाचे तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी कार मधील पोत्यांची तपासणी केली असता त्यात प्रिमीयम राजनिवास पानमसाला, केसरयुक्त वजीर, जाफरानी जर्दाचे पोते आढळून आले. पोलिसांनी गुटखा व कार ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक खार्डे यांच्या तक्रारीवरून नवीदखान इसाखान पठाण (रा. वसमत) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक कदम पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...