आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Hamatma Gandhi Rojagar Hami Yojna | Marathi News | 23,000 Gram Sevaks In The State Will Participate In The Strike; Other Demands Include Setting Up A Separate Mechanism For Guarantee Scheme

रोजगार हमी योजना:राज्यातील 23 हजार ग्रामसेवक संपात सहभागी होणार; हमी योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यासह इतर मागण्यांचा समावेश

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील सुमारे २३ हजार ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक बुधवारपासून (ता.२३) दोन दिवसीय संपात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

या संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे पाटील, राजेश किलचे, मंचक भोसले, महमद कलीम यांनी माहिती दिली आहे. राज्यातील ग्रामसेवकांचे प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. जूनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हि दोन्ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी या पदाची निर्मिती करावी, या पदासाठी शैक्षणिक अर्हता पदवीधर असावी, कोविड काळात कर्तव्यावर असतांना मृत्यू झालेल्या ग्रामसेवकांच्या वारसांना तातडीने ५० लाख रुपये द्यावेत, किमान सेवानिवृत्ती वेतन योजनेमध्ये केंद्र शासनाप्रमाणे वाढ करावी, सर्वांना किमान वेतन द्यावे, राज्यातील शासकिय कार्यालयातील रिक्तपदे तातडीने भरावी यामध्ये आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागातील पद भरतीला प्राधान्य द्यावे यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्य शासकिय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यात बुधवारपासून (ता.२३) दोन दिवसीय लाक्षणीक संप केला जाणार आहे. या संपामध्ये ग्रामसेवक संघटना देखील वरील मागण्यांसाठी सहभागी होणार आहे. राज्यातील सुमारे २३ हजार ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी होणार असल्याने पुढील दोन दिवस ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...