आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगांची गैरसोय दूर होणार:हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना धान्याचे घरपोच वाटप; 5 टक्के निधी राखीव

हिंगोली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीतील बळसोंड ग्रामपंचायतीच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग व्यक्तींना सोमवारी (ता. 13) दुपारी धान्याचे घरपोच वाटप करण्यात आले. पुढील दोन ते तीन महिने पुरेल एवढे धान्य वाटप झाल्याने दिव्यांगांची पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर होणार आहे. ग्रामपंचातीच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

जाणून घेतल्या गरजा

हिंगोली शहरालगत बळसोंड ग्रामपंचायतींने दिव्यांगांसाठी 66 हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरपंच शैलेश जयस्वाल, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, ग्रामसेवक राजेश किलचे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी दिव्यांग व्यक्तींची यादी तयार करून त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या गरजा जाणून घेतल्या.

घरपोच दिले किट

पावसाळ्यात या दिव्यांग व्यक्तींचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो त्यातच सलग दोन ते तीन दिवस पाऊस लागून राहिल्यास दिव्यांग व्यक्तींची मोठी गैरसोय होते. त्यामुळे त्यांना किमान दोन ते तीन महिने पुरेल एवढे धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये तेल, मीठ, साखर पासून दररोज लागणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. आज ग्रामपंतायतीच्या वतीने धान्याचे 22 किट तयार करून दिव्यांग व्यक्तींच्या घरी जाऊन धान्याचे किट देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...