आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांविरोधात भाजप आक्रमक:संभाजी महाराजाबद्दलचे वक्तव्य भोवले; पवारांच्या छायाचित्राला जोडेमारो आंदोलन

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या छायाचित्राला जोडेमारो आंदोलन केले. यावेळी अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

हिंगोली शहरात महात्मा गांधी चौकात आयोजित आंदोलनात आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रा. दुर्गादास साकळे, माजी नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुठ्ठे, बाजार समितीचे संचालक प्रशांत सोनी, उमेश नागरे, संदीप वाकडे, ॲड. अमोल जाधव, अग्रवाल, हमीद प्यारेवाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुध्द कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर दिसत आहे. हिंगोलीसह पुणे आणि नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोडोमारो आंदोलन केले आहे. पुण्यात तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली आहे. पुण्यात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तर नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे, अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आंदोलनात सहभागी झाले, तर हिंगोलीमध्ये आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह माजी खासदार शिवाजी माने हे देखील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...