आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरतीचा सराव करत असतानाच काळाचा घाला:तरुणीला भरधाव कारने 10 ते 12 फूट उंच उडवले, जागीच ठार

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोलीतील चोंढीफाटा-औंढा मार्गावर घटना

चोंढीफाटा ते औंढा मार्गावर पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणीला कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये तरुणी 10 ते 12 फुट उंच उडून खाली पडली अन तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 6 वाजता ही घडली आहे. कन्याकुमारी कृष्णा भोसले (19, आंबा, ता. वसमत) असे तरुणीचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील आंबा येथील कन्याकुमारी भोसले व तिच्या दोन मैत्रिणी चोंढी फाटा ते औंढा मार्गावर धावण्याचा सराव करत होत्या. यावेळी दोन मैत्रिणी पुढे धावत होत्या तर कन्याकुमारी मागे होती. यावेळी एका पेट्रोलपंपाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने कन्याकुमारीला जोरदार धडक दिली.

10 ते 12 फुट उंच उडाली

या धडकेमुळे कन्याकुमारी सुमारे 10 ते 12 फुट उंच उडाली अन रस्त्यावर कोसळली. या अपघातानंतर कार चालकाने कार थांबवून तिला पहिले मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने कार सह पलायन केले. हा प्रकार परिसरातील आखाड्यावर असलेल्या एका शेतकऱ्याने पाहिला. त्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली

समोर धावणाऱ्या मैत्रिणींना जोरात ओरडल्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी मागे पाहिले असता कन्याकुमारी रस्त्यावर पडलेली दिसून आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार बालाजी जोगदंड, विनायक जानकर, ज्ञानेश्‍वर ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कन्याकुमारीला वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

बातम्या आणखी आहेत...