आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:फाळेगाव येथे पत्नीचा जाळून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप, हिंगोली न्यायालयाचा निकाल

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथे चहा करण्यास उशीर लावण्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण करून पेटवून देत खून करणाऱ्या पती रविंद्र नारायण टाले (25) यास खूनाच्या आरोपावरून जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी मंगळवारी ता. 22 दिला आहे.

याबाबत सहायक सरकारी वकील अॅड. एस.डी. कुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील काळेगाव येथील राधाबाई रवींद्र टाले (25 ) यांना त्यांचे पती रवींद्र नारायण टाले याने ता. 28 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी साडेचार वाजता चहा करण्यास उशीर केल्याच्या कारणावरून भांडण केले तसेच त्यांना मारहाण केली. यावेळी रवींद्र याने राधाबाई यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या. यावेळी शेजारच्या रहिवाशांनी भाजलेल्या राधाबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांनी पती रवींद्र यांनी पेटवून दिल्याचा जवाब हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिला. तर उपचार सुरू असतानाच ता. 21 सप्टेंबर 2016 रोजी राधाबाई यांचा मृत्यू झाला. त्यांनी दिलेल्या मृत्युपूर्व जबाबावरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी रवींद्र टाले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पी.आर. वांद्रे यांनी अधिक तपास करून हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी रवींद्र टाले यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एस. डी. कुटे यांनी काम पाहिले तर त्यांना अॅड. एन. एस. मुटकुळे, अॅड. सविता देशमुख यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...