आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:सवना येथे 80 वर्षाच्या वृद्धाने 78 वर्षाच्या वृद्ध पत्नीला हाता बांधून जाळले, खुनाचा गुन्हा दाखल

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील सवना येथे स्वयंपाक उशिरा का केला या कारणावरून 80 वर्षाच्या वृद्ध पतीने 78 वर्षाच्या वृद्ध पत्नीला हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.26) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंडलिक शिवराम नायक असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सवना येथे कुंडलिक शिवराम नायक व त्यांची पत्नी सुंदराबाई कुंडलिक नायक हे दोघे राहतात. त्यांना पाच मुली असून त्यांचे लग्न झाले आहे. त्यामुळे दोघेच पती-पत्नी घरी राहतात.

दरम्यान, शुक्रवारी 25 दुपारी स्वयंपाक उशिरा का केला या कारणावरुन कुंडलिक यांनी त्याची पत्नी सुंदराबाई यांच्याशी वाद सुरू केला या वादातून त्याने सुंदराबाई हातपाय बांधून त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. सदर प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुंदराबाई यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबूराव जाधव, आमदार राहुल गोटरे, गजानन बेडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी जरिता वाघ यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस आहेत कुंडलिक नायक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कुंडलिक यास अटक केली आहे. पोलिस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...