आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:साखरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यास मारहाण, सरकारी कामात अडथळा आणल्याने एकावर गुन्हा

हिंगोली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकाऱ्यास मारहाण करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या एका व्यक्ती विरुध्द सेनगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. १२ पहाटे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

नक्की झाले काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन कदम हे गुरुवारी ता. ११ रात्री आकरा वाजता कर्तव्यावर होते. यावेळी खडकी येथील एकनाथ हराळ हा व्यक्ती आरोग्य केंद्रात उपचारासाठी आला. त्याला कुत्रे चावल्याचे त्याने वैद्यकिय अधिकारी डॉ. कदम यांना सांगितले. यावरून डॉ. कदम यांनी त्याच्यावर औषधोपचार सुरु केले.

मात्र तुम्हाला उपचार करता येत नाहीत, तुमचे काम बरोबर नाही असे म्हणून डॉ. कदम यांच्यासह उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. मात्र त्यानंतरही त्याच्यावर उपचार केले जात होते. यावेळी त्याने अचानक डॉ. कदम यांची गच्ची धरून त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे सर्वच जण घाबरून गेले. यावेळी एकनाथ याने तुम्हा सर्वांना पाहून घेतो अशी धमकी दिली.

गुन्हा दाखल

या प्रकारामुळे घाबरलेल्या डॉ. कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पहाटे थेट सेनगाव पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी एकनाथ हराळ याच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, जमादार जीवन मस्के, असोले पुढील तपास करीत आहेत.