आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:आरोपीच्या अटकेसाठी आलेल्या कोरेगाव पोलिस पथकावर हल्ला, उपनिरीक्षकाला धक्काबुक्की, 26 जणांवर औंढा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्हातील कोरेगाव पोलिस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्हयात अटक करण्यात आलेल्या पोलिस पथकावर ब्राम्हणवाडा तांडा (ता.आैंढा) येथे आरोपींसह नातेेवाईकांनी हल्ला करून धक्काबुक्की केले तर वाहनाच्या काचाही फोडल्या.

या प्रकरणी २६ जणांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ५ पहाटे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

नक्की प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राम्हणवाडा तांडा येथील विनोद नागोराव राठोड हा मुकादम म्हणून काम करतो. त्याने सातारा जिल्ह्यातील जरंडेश्‍वर कारखान्याला ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी ८ लाख रुपयांची रक्कम घेतली. मात्र मजूरांचा पुरवठा केलाच नाही. त्यामुळे त्याच्यावर कोरगाव (जि.सातारा) पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, विनोद हा त्याच्या गावाकडे असल्याची माहिती मिळाल्यावरून कोरेगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक राऊत, जमादार एस. एस. लावंड, एस. एस. सोनुळे, औढा पोलिस ठाण्याचे कर्मचारी गोरे यांचे पथक त्याला अटक करण्यासाठी गेले. पोलिसांनी रात्रीच्या वेळी त्याच्या घरीजाऊन आवाज दिला तो बाहेर आल्यानंतर त्याला कोरेगाव पोलिस असल्याचे सांगितल्यानंतर विनोदने आरडा ओरड करण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे त्याचे नातेवाईक व गावकरी जमा झाली. त्यांनी थेट पोलिस पथकावरच हल्ला चढविला. यामध्ये उपनिरीक्षक राऊत यांच्यासह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून खाजगी वाहनाच्या काचा फोडल्या. त्यामुळे सदर पथक परत आले.

23 जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, आज पहाटे उपनिरीक्षक राऊत यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी विनोद नागोराव राठोड, नागोराव राठोड, संतोष सुरेश राठोड यांच्यासह अन्य २३ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, हनुमान बेले पुढील तपास करीत आहेत.