आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:दारु पिऊन कर्तव्यावर आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबीत, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांची कारवाई

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ येथे तपासणीच्या वेळी दारु पिऊन गेलेले हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. गिरी यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी नुकतेच काढले आहेत.

हिंगोली शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. गिरी यांच्यावर रविवारी औंढा नागनाथ पोलिस ठाण्याची तपासणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र या तपासणीच्या वेळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. या प्रकाराची माहिती औढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी थेट पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांना कळवली होती.

त्यावरून त्यांची वैद्यकिय तपासणी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यावरून औढा पोलिसांनी गिरी यांची वैद्यकिय तपासणी केली असता ते दारूच्या अंमलाखाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. यावरून सोमवारी (दि.10) औंढा पोलिस ठाण्यात गिरी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी तातडीने अहवाल सादर करण्याच्या सुचना औंढा पोलिसांना दिल्या होत्या. त्या अहवालानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. याशिवाय त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.