आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर प्रतीक्षा संपली:हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल 94.77 टक्के; मुलींनी मारली बाजी

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल 94.77 टक्के लागला असून, जिल्ह्यातील 15,555 पैकी 14,743 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 5346 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

इयत्ता दहावीच्या परीक्षा मध्ये यावर्षी शाळांना परीक्षा केंद्र देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसोबत प्रशासनाची ही परीक्षा होती. प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पुरवणे तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे होते. मात्र जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेगूलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड, गणेश वाघ, आत्माराम बोंद्रे यांच्या पथकाने योग्य नियोजन केले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये परीक्षा सुरळीत पार पडल्या.

विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

दरम्यान, आज निकाल पाहण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. हिंगोली जिल्ह्यात 15 हजार 555 विद्यार्थ्यांपैकी 14 हजार 743 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 94.77 टक्के लागला आहे. जिल्ह्यातून 5346 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून 5762 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 3072 विद्यार्थी द्वितीय, श्रेणीत तर 563 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 75 शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.

औंढा नागनाथ तालुक्याचा निकाल 95.98 टक्के

हिंगोली जिल्हयात औंढा नागनाथ तालुक्याचा निकाल 95.98 टक्के लागला आहे. तालुक्यातील 1866 पैकी 1791 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 532 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 771 विद्यार्थी प्रथमश्रेणीत, 409 द्वितीय, 79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हिंगोली तालुक्यातील 4016 पैकी 3786 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 1286 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, 1390 विद्यार्थी प्रथमश्रेणीत, 892 द्वितीय, 215 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 94.99 टक्के लागला आहे. कळमनुरी तालुक्यातील 3107 पैकी 2941 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 1143 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, 1315 विद्यार्थी प्रथमश्रेणीत, 558 द्वितीय, 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 94.60 टक्के लागला आहे. वसमत तालुक्यातील 4195 पैकी 3983 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 1510 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 1514 विद्यार्थी प्रथमश्रेणीत, 854 द्वितीय, 108 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 95.01 टक्के लागला आहे. सेनगाव तालुक्यातील 2371 पैकी 2242 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 875 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 952 विद्यार्थी प्रथमश्रेणीत, 359 द्वितीय, 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 94.55 टक्के लागला आहे.

निकालामध्ये मुलींची बाजी

दहावी बोर्डाच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली असून, जिल्ह्यातील 8384 मुलांपैकी मुले विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 92.99 टक्के आहे. तसेच 7171 मुलींपैकी 6943 मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 96.86 टक्के एवढी आहे.

बातम्या आणखी आहेत...