आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा सत्कार:हिंगोली जिल्ह्यातील 1 पोलीस अधिकार्‍यासह 5 कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार

हिंगोली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील पोलीस दलात उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते रविवारी ता.1 सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पोलीस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह दिली जाते. यामध्ये सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देण्यात येते. राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने सन्मानचिन्हा साठी निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत.

यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप घुगे, जमादार अशोक धामणे, शेख शकील, ओमप्रकाश पंडितकर, विक्रम कुंदनानी यांचा समावेश आहे. हिंगोली येथे रविवारी ता. 1 ध्वजवंदना नंतर पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...