आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Hingoli Farmers Son Police Inspector | The Son Of A Farmer From Wai Became The Deputy Inspector Of Police, Number One In The State From The Scheduled Tribes Category | Marathi News

जिद्द आणि परिश्रमाचे फळ:वाई येथील शेतकऱ्याच्या मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक, अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील वाई येथील शेतकरी कुटुंबातील शिवाजी नागोराव ढाकरे तरुणाने लोकसेवा आयोगाची परीक्षेत अनुसूचित प्रवर्गातून राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. कळमनुरी तालुक्यातील वाई येथील शिवाजी नागोराव ढाकरे यांच्या घरी कुठल्याही प्रकारची शैक्षणिक वातावरण नव्हते. आई वडील कोरडवाहू शेतामध्ये काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यामुळे शिवाजी यांनाही अनेक वेळा शेतातच काम करावे लागत. मात्र शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले होते.

वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तसेच व येथील बालाजी विद्यालयात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नांदेडचे यशवंत महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेतले. मात्र त्यानंतर अधिकारी होण्यासाठी त्यांनी थेट पुणे गाठले. पुणे हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयतून २०१८ मध्ये बीएचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. जिद्द व परिश्रम या जोरावर त्यांनी १२ ते १८ तास अभ्यास व स्वतःच्या नोट्स काढून परीक्षेची तयारी केली. अनेक वेळा त्यांना शेतात येऊनही काम करावे लागले. शेतात दिवसा काम केल्यानंतर रात्रीच्या वेळी शेतातच अभ्यासही केला.

दरम्यान सन २०१९ मध्ये त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर आता बाजी मारणार असा आत्मविश्वास निर्माण झाला. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यश टप्यात आले. मुलाखत यशस्वीपणे पार पडली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिवाजी ढाकरे यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवत यशाला गवसणी घातली. त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. मुलाचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनाही आकाश ठेंगणे झाले.

त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते, अॅड. प्रशांत बोडखे, विलास मस्के, मुकुंदराव वाईकर, नामदेव लाखाडे, काळूराम साबळे, शेकुराव मुकाडे, भीमराव मुकाडे, राधेश्याम दुधाळकर, उत्तमराव कबले, आप्पाराव दुधाळकर, हरिभाऊ दुधाळकर, लक्ष्मण गुहाडे,दत्तराव कांबळे व गावकरी उपस्थित होते.

जिद्द व परिश्रमाची तयारी ठेवावी : शिवाजी ढाकरे
ग्रामीण भागातील विद्यार्थी ही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी जिद्द व परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे. तसेच ध्येय निश्चित करून त्यानुसारच तयारी केली पाहिजे. माझ्या यशाचे श्रेय आई वडिलांना जाते.

बातम्या आणखी आहेत...