आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औंढा नागनाथ मार्गावर 38 किलो गांजासह 14.65 लाखांचा ऐवज जप्त:लोहमार्गा पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

हिंगोली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ येथील शासकिय विश्रामगृहाजवळ एका कारच्या तपासणीमध्ये 9.65 लाख रुपयांचे किंमतीच्या 38 किलो 600 ग्राम गांजासह 14.65 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 2 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये पूर्णा लोहमार्ग चौकीच्या पोलिस कर्मचाऱ्याच्या समावेश आहे.

परभणीकडून एका कारमध्ये गांजा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर कार औंढा मार्ग हिंगोलीकडे जाणार असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार संभाजी लकुळे, गजानन पोकळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्‍वर पायघन, तुषार ठाकरे, रवीकांत हरकाळ, गिरी, थिटे यांच्या पथकाने गुरुवारी दुपार पासून औढा नागनाथ ते हिंगोली व औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली होती.

दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास औढा नागनाथ येथील शासकिय विश्रामगृहाजवळ एक विस्टा कार उभी असल्याचे पोलिसांना दिसले. त्यावरून पोलिसांनी कारमधील तीन व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी कारसह तिघांना ताब्यात घेऊन औढा नागनाथ पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कारची तपासणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाचे 14 पाकिटे चिकटपट्टीने घट्ट गुंडाळलेली दिसून आले. पोलियांनी पाकिटे उघडून पाहिले असता त्यात गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान या गांजाचे वजन 38 किलो 600 ग्राम होते तर त्याची किंमत 9 लाख 65 हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी गांजा व कार असा 14.65 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे यांच्या तक्रारीवरून शेख गौस शेख पाशा (रा. पूर्णा), रविंद अमरसिंह राठोड (रा.वाशीम, नोकरी लोहमार्ग पोलिस चौकी पूर्णा), शेख मईनोद्दीने शेक अलीमुद्दीन (रा. पूर्णा) यांच्या विरुध्द औढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गांजा आला कुठून याचा शोध सुरू

पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये त्यांनी गांजा आणला कुठून तसेच कुठे नेला जात होता याची माहिती घेण्यात सुरवात केली असून यामध्ये लोहमार्गा चौकीचा कर्मचारी असल्याने यापुर्वी रेल्वेने गांजाची तस्करी केली जात होती काय याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...