आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव:हिंगोलीत प्रशासनाकडून 75 किलोमीटर तिरंगा सायकल रॅली, 200 पेक्षा अधिक सायकलपट्टू सहभागी होणार

हिंगोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी ता. 14 सकाळी सात वाजता 75 किलोमीटर तिरंगा सायकल रॅली काढली जाणार आहे. या रॅलीमध्ये सुमारे 200 पेक्षा अधिक सायकलपट्टू सहभागी होणार आहेत. हिंगोलीत प्रथमच आयोजित रॅली नागरिकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.

हिंगोली शहरासह परिसरात सायकलपट्टूंची संख्या सुमारे 30 पेक्षा अधिक आहेत. यामध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा रॅली काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी या रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत सुरुवातीला 75 सायकलपट्टूंचा सहभाग घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील सुमारे 200 पेक्षा अधिक सायकलपट्टूंनी नोंदणी केली आहे.

रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन

हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदानावरून सकाळी सात वाजता तिरंगा ध्वज हाती घेऊन या रॅलीला सुरुवात होणार आहे. हिंगोली-सेनगाव ते कोळसा व परत कोळसा-सेनगाव ते हिंगोली असा 75 किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलपट्टूंना पदक व प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी गणेश शिंदे, शहजाद पठाण, प्रविण काळबांडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...